Ad will apear here
Next
एलिझाबेथ टेलर, प्रकाश झा


प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर आणि हिंदी चित्रपट निर्माते प्रकाश झा यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
..........
एलिझाबेथ टेलर
२७ फेब्रुवारी १९३४ रोजी एलिझाबेथ टेलर यांचा जन्म झाला. जिवंतपणीच दंतकथा बनण्याचा मान त्यांना मिळाला. हॉलिवूडच्या सुवर्णकाळाची एक अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या एलिझाबेथ टेलर या लिझ या नावाने ओळखल्या जायच्या. हॉलिवूडमधील कारकीर्द संपल्यानंतरही सतत चर्चेत राहिल्या. 

मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून वयाच्या नवव्या वर्षी त्या सर्वप्रथम ‘देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकल्या. ‘फादर ऑफ द ब्राइड’ या चित्रपटाद्वारे त्यांनी नायिका म्हणून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एलिझाबेथ टेलर यांनी पॉल न्यूमन, रॉक हडसन, जेम्स डीन, मार्लन ब्रँडो आदी दिग्गज नायकांबरोबर काम केले. ‘क्लिओपात्रा’, ‘जायंट’, ‘बटरफिल्ड’, ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’, ‘नॅशनल वेलवेट’ आदी त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. एलिझाबेथ टेलर यांना १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बटरफिल्ड एट’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना दोनवेळा सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून अॅकेडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हॉलिवूडमधील अन्य अनेक पुरस्कारही त्यांनी मिळविले होते. एलिझाबेथ टेलर यांनी केलेले एकूण आठ विवाह हा जगभर चर्चेचा विषय बनला. त्यातही जगप्रवासी, तसेच हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या गेलेल्या रिचर्ड बर्टन यांच्याबरोबर दोन वेळा झालेला विवाह विशेष होता. बर्टन यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटही केले होते. संपूर्ण आयुष्य उत्फुल्लतेने आणि रसपूर्णतेने जगलेली अभिनेत्री म्हणून एलिझाबेथ टेलर यांना जग ओळखत असे. एलिझाबेथ टेलर यांचे २३ मार्च २०११ रोजी निधन झाले.
......


प्रकाश झा
२७ फेब्रुवारी १९५२ रोजी प्रकाश झा यांचा जन्म झाला. बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवलपासून आताच्या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा अशा सर्व स्टार नायिकांना घेऊन चित्रपट बनविले आहेत. 

दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ हा होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमी यांनी त्यांच्या ‘मृत्युदंड’मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांच्या यादीत स्थान आहे. कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगणसोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नव्हता; मात्र प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. 

अजय देवगणसोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. ‘अपहरण’मध्ये बिपाशा बसू होती. तिने बिहारी मुलीचा रोल केला होता. बिपाशानंतर ‘राजनीति’मध्ये त्यांनी कॅटरिना कैफ, ‘आरक्षण’मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करिना कपूरला घेतले. प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाच्या जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे आहेत. अनेक चित्रपटात एकसंध पटकथा, कथानकातील नाट्य टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणेही अवघड नाही. प्रकाश झा यांनी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZNUCJ
Similar Posts
‘लावण्यवती’ चित्रपटसृष्टीच्या चंदेरी चमचमीचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या व तारे-तारकांच्या चकचकीत प्रतिमांची रेलचेल असलेल्या अनेक मासिकांमधून मी या अभिनेत्रीचे असंख्य फोटो पाहिले होते. त्या सर्व प्रकाशचित्रांत तिने केलेला मेक-अप वेगवेगळा असला तरी त्याचं साह्य पुरेपूर होतं; पण आत्ता समोर चेहऱ्यावर कणभरही मेक-अप नसलेली माधुरी उभी होती
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language